रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र प्रादेशिक योजना निर्माण करण्याचा निर्णय
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रादेशिक योजना सन १९८७ मध्ये मंजूर करत फेब्रुवारी १९८८ पासून अंमलात आली. मात्र ही प्रादेजिक योजना तयार करून बराच कालावधी उलटल्याने शासनाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी आता स्वतंत्र प्रादेशिक योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या स्वतंत्र द्रूतगती प्रादेशिक योजना तयार करण्यात येणार आहेत.जिल्हा अथवा त्या प्रदेशाच्या विकासात्मकदृष्ट्या प्रादेशिक विकास योजना तयार केल्या जातात. या प्रादेशिक योजनांमध्ये विकासाच्या सर्व पैलूंचा विचार केला जातो. यात घराच्या गरजा, नोकरीच्या संधी, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय समस्या, जमीन वापराचे नमुने, प्रदेशाच्या भविष्यकालीन वाढीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधांचे मूल्यांकन यात असते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा विचार केला तर या दोन जिल्ह्यांची भौगोलिक स्थितीत साधारणतः सारखी असल्याने तत्कालीन स्थितीत या दोन जिल्ह्यांच्या प्रादेशिक योजनेचा विचार करता ती एकच करण्यात आली.www.konkantoday.com