
रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या गावातील महिला करतायेत समुद्र शेवाळी शेती
*समुद्री शेवाळाच्या शेतीमधून रत्नागिरी तालुक्यातील तीन गावांमधील सुमारे शंभर महिलांना थेट रोजगाराची संधी मिळाली आहे. गतवर्षी घेतलेल्या उत्पादनामधून पावणेसात टन समुद्री शेवाळ उत्पादित केले असून त्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार रुपये मिळाले. रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या गावातील महिला ही शेती करत आहेत.महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग आणि 2022 साली ’क्लायमा क्रू प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यात समुद्री शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. याला महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कम्युनिटी सेंटरची मदत आहे. क्लायमा कंपनीने इंडियन सेंटर फॉर क्लायमेट अॅण्ड सोसायटल इम्पॅक्ट रिसर्चच्या मदतीने महिला शेतकर्यांना समुद्री शेवाळ लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.तिन्ही गावांमध्ये ’कॅपाफायकस अल्वारेझी’ या प्रजातीच्या समुद्र शेवाळाची लागवड केली आहे. www.konkantoday.com