मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना केली अटक, दोन आरोपी सिंधुदुर्ग मधील
मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना मिरज शहर अटक करून त्यांच्याकडून तब्बल १९ कोटी २४ लाख किमतीची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा.जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष ऊर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (३५, रा. वायरी मालवण ता. मालवण), वैभव भालचंद्र खोबरेकर (२९, रा. कवठे कुडाळ, देवबाग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी आहे.मिरजेतून कर्नाटकात तस्करी करण्यात येत असलेली जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री मिरज पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, गांधी चौक व मिरज वाहतूक पोलिसांनी वनविभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली.www.konkantoday.com