मिरकरवाडा जेटीवर अतिक्रमण करणार्या मासळी विक्रेत्यांवर कारवाई
वारंवार सांगून आणि इशारा देवूनही मिरकरवाडा जेटीवर मासळी विक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात आहे. मत्स्य विभागाने त्याला दणका दिला असून अतिक्रमण करणार्यांचे टब, टेबल, खुर्ची, फळ्या आदी साहित्य जप्त केले आहे. मत्स्य विभागाच्या या कारवाईची विक्रेत्यांनी धास्ती घेतली असून आता मिरकरवाडा जेटीने मोकळा श्वास घेतला आहे.मिरकरवाडा जेटीच्या दोन्ही बाजूने मासळी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेक वर्षापासून ही कोंडी फोडण्यासाठी विक्रेत्यांना सुसज्ज मच्छिमार्केट बांधून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार मासळी विक्रेत्यांसाठी मोठे मच्छिमार्केट आणि ओटे बांधण्यात आले. मात्र त्याचे उदघाटन झाल्यानंतर एकदोन दिवस विक्रेते तिथे बसले आणि पुन्हा जेटीवर ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमण करणार्या विक्रेत्यांना मार्केटमध्ये बसण्याच्या सूचना केल्या. दोन दिवस त्यासाठी मुदत दिली, तरीही विक्रेत्यांनी न ऐकल्याने मत्स्य विभागाने धडक कारवाई केली. अतिक्रमण करून जेटीवर बसणार्यांचे टब, टेबल, खुर्ची, फळ्या आदी साहित्य जप्त केले. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जेटीवर कोणीही मासळी विक्री करताना दिसत नाही. www.konkantoday.com