फोर जी मोबाईल टॉवरचे रखडलेले काम शीघ्रगतीने करा, संतोष गांगण यांची व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी

नवीन फोर जी मोबाईल टॉवर उभारणीत विलंब होत असल्याने भाजपा नेते संतोष गांगण यांनी बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार पुरवार यांची नवी दिल्ली येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी कोकणातील भौगोलिक स्थिती व मोबाईल नेटवर्क कव्हरेजची संपूर्ण परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पुरवार यांनी त्वरित रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रखडलेले काम शीघ्रगतीने चालू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button