पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे नमन लोककलेला राजाश्रय मिळाला
रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांनी कोकणातील नमन लोककलेला राजाश्रय मिळवून दिला असल्याची माहिती नमन लोककला रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र भारतचे सरचिटणीस पर्शुराम मासये यांनी दिली.नमन लोककला रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र भारत, या संस्थेची स्थापना नमन या लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवून करण्यात आली. जिल्हाभरातील सर्व पदाधिकार्यांनी ऊन, पाऊस याचा विचार न करता रत्नागिरी, चिपळूण, देवरूख, राजापूर, लांजा यांसारख्या ठिकाणी वारंवार सभा घेत आपले विचार व्यक्त करताना राजाश्रय मिळावा म्हणून ठराव पारीत केले. या संस्थेच्या पदाधिकार्यांनी लोकनेत्यांच्या वारंवार भेटी घेऊन सतत पाठपुरावा केला. पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी नमन या लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा शब्द दिला होता.www.konkantoday.com