देशभरात कॉर्पोरेट क्षेत्राला आलिशान गाड्या पुरविणार्या अग्रगण्य कंपनीने केली रत्नागिरी शहराची निवड
देशभरात कॉर्पोरेट क्षेत्राला आलिशान गाड्या व वाहतूक व्यवस्था पुरविण्यात आग्रभागी असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीने आपल्या सेवेचा विस्तार करताना महाराष्ट्रातील आणखी ५ ठिकाणी आपली सेवा पुरविण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये रत्नागिरीचा समावेश असल्याने आता व्यवसाय, उद्योग व पर्यटनासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची पावले मोठ्या संख्येने रत्नागिरीकडे वळतील, असे म्हटले जात आहे.ही कंपनी सैन्यदलातून निवृत्त व्यक्तींनी एकत्र येत १९७३ सालीसुरू केली होती. दिल्ली परिसरात कॉर्पोरेट क्षेत्रात दैनंदिन कर्मचारी वाहतूक, अभ्यास दौरे, व्यावसायिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वर्गाची वाहतूक आदी सेवा पुरविण्यास या कंपनीने सुरूवात केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपल्या सेवेचा विस्तार करत विविध शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली.गतवर्षीपर्यंत देशातील ९० विविध शहरात इको मोबिलिटीची सेवा सुरू होती. यामध्ये लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू, फॉर्चूनर, मर्सिडीस, बंेंझर गाड्या पुरविण्यात येतात. उच्च दर्जाची व्यावसायिक सेवा देण्यामध्ये ही कंपनी देशात अग्रभागी आहे. या कंपनीचे संचालक राजेश लोम्बा यांनी २०२४ साली आपल्या सेवा क्षेत्राचा विस्तार करताना देशातील १० ठिकाणी ही सेवा सुरू करत असल्याचे नुकतेच जाहीर केले.www.konkantoday.com