दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथील गांधीलमाशांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
गांधीलमाशांच्या हल्ल्यात एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आगरवायंगणी येथे घडली आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगरवायंगणी येथील माधव पुरूषोत्तम सहस्त्रबुद्धे (७५) यांच्यावर गुरूवार दि. १४ मार्च रोजी गांधीलमाशांनी हल्ला केला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवार दि. १६ मार्च रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेबाबत दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून ही घटना दाभोळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com