खेड तालुक्यातील पिरलोटे येथे कामगाराचा आकस्मिक मृत्यू

खेड तालुक्यातील पिरलोटे येथे ४२ वर्षीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. झाकीर फंटू असे कामगाराचे नाव आहे. तो फिर्यादीकडे कामाला आला नाही म्हणून त्याच्या घरी जावून दरवाजा वाजवला असता त्यांनी उघडला नाही. अखेर दरवाजा तोडला असता तो खाटेवरून खाली पडलेला निदर्शनास आला. त्याला चिपळूण येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. या बाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button