
अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्याने चिपळूणच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी
तक्रार करूनही चिपळूण शहरातील भोगाळे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्याने तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना सेवेतून निलंबित करा, अशी मागणी येथील नागरिक महेश कांबळी यांनी मुख्याधिकार्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.या अर्जात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२२ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी शिंगटे यांनी भोगाळे येथे अनधिकृत बांधकाम करत असल्याबाबत संबंधित एकाला जावक क्रमांक रचना विभाग/१३९३/२०२२-२३ नुसार नोटीस देवून अनधिकृत बांधकाम तत्काळ बंद करून नोटीस मिळताच ३० दिवसाच्या आत केलेले बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे व न काढल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधित यांनी हे बांधकाम काढून न टाकता ते पूर्ण केले. ही बाब गंभीर स्वरूपाची असतानाही मुख्याधिकारी शिंगटे यांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.www.konkantoday.com