अंजनवेलच्या जलजीवन योजनेची स्पेशल स्कॉडमार्फत चौकशी करण्याची मागणी
गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावातील मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी राबवण्यात येत असलेल्या कोट्यवधींच्या जलजीवन योजनेत अनेक त्रुटी आहेत. याबाबत अधिकार्यांना निदर्शनास आणून देवूनही कोणतीच कार्यवाही होत नाही. यामुळे ही योजना जनतेसाठी नसून शासकीय अधिकारी व ठेकेदारांसाठी राबवली जात आहे. या योजनेची मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमलेल्या स्पेशल स्कॉडमार्फत सखोल चौकशी व कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच यशवंत बाईत व ग्रामस्थांनी केली आहे. www.konkantoday.com