संगमेश्वर बस स्थानकाचे काम सुरू परंतु निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या झळा

_मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाले. मात्र प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्याने उन्हात उभे राहून प्रवाशांना बससाठी थांबावे लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेले संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीसाठी तीन कोटी पाच लाख रुपये मंजूर झाले असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत होते. स्वच्छतागृहांसह इमारतीची दुरावस्था झाली होती. संगमेश्वर बसस्थानकाची जुनी इमारत पूर्णपणे पाडण्यात आली असून नवीन कामाला सुरुवात झाली आहे. बसस्थानक उभारणीच्या कामाला आरंभ झाला असला तरीही प्रवासांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. कोकणात शिमगोसवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात चाकरमानी गावाकडे येत आहेत. संगमेश्वर बसस्थानकामध्ये मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर आदी शहरांकडे जाण्यासाठी प्रवासी संगमेश्वर बसस्थानकामध्ये येत असतो. सद्यःस्थितीत संगमेश्वर बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना थांबण्याची निवारा सोय करणे आवश्यक होते. उन्हाचा कडाका वाढत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहेत. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये थांबून एसटी पकडावी लागत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button