श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली

अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होतांना पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजित पवारांनी ज्या व्यक्तीकडून सल्ले घेतले त्या श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे.बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे.यावेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, “तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्या वरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button