
लांजा येथे 14 वर्षीय मुलीच्या तोंडामध्ये टॉवेल कोंबुन तिच्याशी शारिरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार
लांजा येथे 14 वर्षीय मुलीच्या तोंडामध्ये टॉवेल कोंबुन तिच्याशी शारिरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्याचार प्रकरणी तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला तसेच त्याला अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकाराने प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. संदीप दत्ताराम काटकर (30, रा लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता ही 14 वर्षीय मुलगी असून तिचे आईवडील मोलमजुरीचे काम करतात. 23 जानेवारी 2024 रोजी पीडित मुलगी ही काही कारणांमुळे शाळेमध्ये गेली नव्हती तर तिचे आईवडील हे नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर निघून गेले होते. त्यामुळे ती घरात एकटीच राहिली होती. ती घरी एकटीच असल्याचे संशयित संदीप काटकर याला समजले त्यानुसार त्याची पावले ही पिडीतेच्या घराकडे वळली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संदीप हा पीडितेच्या घरामध्ये शिरला. मुलगी आरडाओरडा करू नये यासाठी संदीप याने प्रथम तिच्या तोंडामध्ये टॉवल कोंबला तसेच जमिनिवर खाली पाडून तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक अत्याचार केला अशी तक्रार लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.संदीप हा पीडित मुलीवर अत्याचार करत असताना तिची आई घरी आली. संदीप हा आपल्या मुलीसोबत गैरप्रकार करत असल्याचे पाहताच . तिने संदीप याला हाताच्या थापटाने मारहाण करत आपल्या मुलीची सुटका करून घेतली. या सर्व प्रकाराने संतापलेल्या पिडीतेच्या आईने संदीप याच्याविरूद्ध लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.www.konkantoday.com