
लांजा तालुक्यातील ५५० शिक्षकांपैकी तब्बल ३३४ शिक्षकांनी आजारी पडल्याचे दाखवत वैद्यकीय बिलासाठी अर्ज केले, बिलापोटी 95 लाखाची मागणी
लांजा तालुक्यातील ५५० शिक्षकांपैकी तब्बल ३३४ शिक्षकांनी आजारी असल्याचे दाखवत वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जि.प.कडे सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल ९५ लाखाची ही बिले आहेत. एवढ्याशा छोट्या तालुक्यात इतके शिक्षक आजारी पडतात ही आश्चर्यचकीत करणारी बाब आहे.राज्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक तसेच सरकारमान्य अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वैद्यकीय खर्च देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांना वैद्यकीय बिले शिक्षणाधिकार्यांकडे सादर करावी लागतात. १ लाखापर्यंतचे बील मंजूर करण्याचे अधिकार शिक्षणाधिकार्यांना आहेत. तर १ लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे अधिकार विभागीय अधिकार्यांना आहेत.दरवर्षी जिल्हाभरातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही वैद्यकीय बिले सादर करतात. यामध्ये टक्केवारीचे गणित असल्याने ही बिले चर्चेतसुद्धा येतात. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या ही ६ हजारच्या घरात आहे. मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ९ तालुक्यांतून जवळपास ५०० शिक्षकांनी या वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी जि. प. कडे प्रस्ताव सादर केले आहेत.www.konkantoday.com