राजापूर, येथील महिला पतसंस्थेच्या तिन नवीन शाखांना मंजूरी
_राजापूर, येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेला पाचल, कोंड्ये व आडीवरे अशा तीन ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राजापूर तालुक्यात विस्तारणार आहे. यासाठी पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा, विद्यमान संचालिका व भाजपच्या महीला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे यांनी सहकाऱ्यांसह विशेष प्रयत्न केले होते.सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि सहकार विभागाचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी शाखा मंजुरीचे पत्र सौ. मराठे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे आता या भागातील महिलांना आपली हक्काची बँक मिळणार आहे. महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता आहे. पतपेढीच्या तालुक्यातील इतर भागात शाखा असाव्यात त्यादृष्टीने संस्था पदाधिकार्यांकडून प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले. अनिकेत पटवर्धन यांच्या मार्फत मंत्री चव्हाण यांच्याशी मुंबईत येथे भेट घेऊन चर्चा केली होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याची तात्काळ दखल घेत चव्हाण यांनी सहकार आयुक्त निबंधक पुणे यांच्याशी चर्चा करून महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या तालुक्यातील शाखा विस्ताराचे पत्र देण्याची शिफारस केलीwww.konkantoday.com