राजापुरातही बुधवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
_राजापूर शहराचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील खालावलेला पाणीसाठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शीळ जॅकवेलच्या येथून पाणीसाठा होण्यामध्ये अडथळे येत आहेत.त्यामुळे पालिकेने शहरामध्ये बुधवारपासून (ता. २०) दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्या ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास, त्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल होऊ शकेल याची नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.www.konkantoday.com