राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या
निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एसटी बसवर ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ या जाहिराती लावल्या होत्या.या जाहिरातीसह इतर राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत.एसटी महामंडळातील दुरावस्थेत असलेल्या बसवर राज्य सरकारने लावलेल्या ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ ही जाहिरात लावली होती. एसटी बस, बस स्थानक, आगारात व विविध आस्थापनावर अधिकृत / अनधिकृतपणे राजकीय जाहिराती लावल्या आहेत. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे.एसटी बसवर जाहिरात करणारे परवानाधारक ‘मे. प्रोॲक्टिव इन आऊट ॲड प्रा. लि.’ यांच्या मार्फत बसवरील राजकीय जाहिराती काढून टाकण्यात येत आहेत. परंतु, सर्व आगारात या जाहिरातदारांचे मनुष्यबळ नसल्याने, एसटी महामंडळाला स्वतः पुढाकार घेऊन जाहिराती हटवाव्या लागणार आहेत. जाहिरात काढण्यासंदर्भातील खर्चाची रक्कम संबंधित परवानाधारक जाहिरातदारांकडून वसूल केली जाणार आहेत.www.konkantoday.com