रत्नागिरी तालुक्यातील खानु येथून बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह खानू चाँदसुर्या येथील जंगलमय भागात कुजलेल्या अवस्थेत सापडला
_रत्नागिरी तालुक्यातील खानु येथून बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह खानू चाँदसुर्या येथील जंगलमय भागात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना शुक्रवार 15 मार्च रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास उघडकीस आली.बाळु कृष्णा सुवारे (85,रा.खानु कोनवाडे,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.शुक्रवार 8 मार्च रोजी सकाळी ते मुलगी उज्वलाकडे न्याहरी करण्यासाठी गेले होते. परंतु,त्यानंतर ते पुन्हा मुलीकडे गेलेले नाहीत. व ते कोठेही मिळून आलेले नाहीत. त्यांचे नातेवाईक आणि ग्रामीण पोलिस त्यांचा शोध घेत असताना शुक्रवार 15 मार्च रोजी त्यांचा मृतदेह खानू चाँदसुर्या या ठिकाणी जंगलमय भागात झाडीमध्ये मिळून आला.www.konkantoday.com