रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा शिमगोत्सव साजरा करण्यात येणार
_रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. २१ मार्चला लक्ष्मीकेशवाच्या पालखीचे सकाळी ८ वा. फणसोप मंदिरातून प्रस्थान होणार असून, सकाळी ९ वाजता कसोप येथे पालखीचे आगमन होईल.यानिमित्त रात्री १० वाजता दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे. २२ मार्चला रात्री १० वाजता विनोदी लोकनाट्य कोकणचा साज, संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम होईल. २३ मार्चला रात्री ९ वाजता ढोलवादन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ होईल. रात्री ११.४५ वाजता श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.www.konkantoday.com