कोकणातील प्रमुख उत्सव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात जल्लोषात सुरवात
कोकणातील प्रमुख उत्सव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात जल्लोषात सुरवात झाली आहे. शिवरेची होळी तोडुन ती पेटवण्याची परंपरा आजही दरवर्षीच्या उत्साहात यंदाही सुरु आहे. ढोल-ताशांच्या गजरात होळी आणण्यात आल्या. तरूणांसह प्रौढही उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले पहायला मिळत आहेत. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण होळीमय झाले आहे.शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी राज्यातून, परजिल्ह्यातून ग्रामस्थ कुटुंबासह गावात येतात. जिल्ह्यात १ हजार ५२० पालख्या धुलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला येणार आहेत. १ हजार ३१२ ठिकाणी सार्वजनिक, तर २ हजार ८४० खासगी होळ्या उभारण्यात येणार असून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतांचे स्वागत होळी व शिमगोत्सव साजरा होणार आहे. गावागावातील ग्रामदेवातांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या पालख्या शिमगोत्सावाच्या दिवशी होळ्या घेण्यासाठी मंदिराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगणार आहे. शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.www.konkantoday.com