उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकूण 16 जागांसाठीचे उमेदवार ठरले

_लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीची लढत होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची स्थिती पाहता कोण गड राखेल असे प्रश्न जनतेला आहेच, त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काम सुरू झालं आहे.शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी यादी ठरविण्यात आली आहे. उबाठा पक्षाने एकूण 16 जागांसाठी उमेदवार ठरले आहेत.दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत तर द.मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. तर संभाजीनगरामधून चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जवळपास ठरले आहे, अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. यामध्ये विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता विनोद घोसाळकर यांचं नाव समोर आलं आहे.16 जागांवर कोणा कोणाला संधी देण्यात आली वाचा सविस्तर१) विनोद घोसाळकर उत्तर मुंबई२) संजय दिना पाटील इशान्य मु़बई३) अरविंद सावंत दक्षिण मुंबई४) अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई५) चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजी नगर६) नरेंद्र खेडकर बुलढाणा७) संजय देशमुख यवतमाळ८) ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद९) बंडु जाधव परभणी१०) वाघचौरे शिर्डी११) विजय करंजकर नाशिक१२) राजन विचारे ठाणे१३) अनंत गिते रायगड१४) नागेश अष्टीकर हिंगोली१५) विनायक राऊत रत्नागिरी- सिंधुदुर्ग१६) चंद्रहास पाटील सांगलीअद्याप ठरलेलं नाही१७) कल्याण डोंबिवली१८) संजोग वाघेरे मावळ१९) पालघर२०) जालनाwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button