अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर “हद्दपारीची कारवाई”.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करूणेबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या पूर्व इतिहासाची पडताळणी करून, त्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी व मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी सूचना दिलेल्या होत्या.त्या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणारा सराईत गुन्हेगार सर्फराज ऊर्फ बॉक्सर अहमद शहा, रा. गवळीवाडा, ता. जि. रत्नागिरी याचे विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्रीचे तसेच जुगार कायद्या अंतर्गत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सर्फराज ऊर्फ बॉक्सर अहमद शहा याच्या गुन्हेगारी पूर्व इतिहासाची पडताळणी करून, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांनी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ५६(१)(अ) प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्या न्यायालयामध्ये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेल्या हद्दपार प्रस्तावाचे अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी सदर प्रस्तावाची सुनावणी करून, सर्फराज ऊर्फ बॉक्सर अहमद शहा यांचे विरुद्ध सादर केलेला प्रस्ताव मान्य करून, सर्फराज ऊर्फ बॉक्सर अहमद शहा यास ०२ वर्षा करिता रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचा आदेश दि. १५/०३/२०२४ रोजी पारीत केलेला आहे.तसेच सावर्डे पोलीस ठाणे हद्दीमध्ये रहाणारा सज्जाद हसन काद्री, रा. सावर्डे, अडरेकर मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याच्या विरुद्ध सावर्डे तसेच चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये नशा करण्यासाठी मेडीकल स्टोअर्स मधून टर्मिन नावाची इंजेक्शन चोरी करण्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याचे विरुद्ध सावर्डे व चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरी व घरफोडी सारखे गुन्हे देखील दाखल आहेत. त्याचे गुन्हेगारी पूर्व इतिहासाची पडताळणी करून, पोलीस निरीक्षक, सावर्डे पोलीस ठाणे यांनी सज्जाद हसन काद्री विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(ब) प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्या न्यायालयामध्ये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस निरीक्षक, सावर्डे पोलीस ठाणे यांनी सादर केलेल्या हद्दपार प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांनी सदर प्रस्तावाची सुनावणी करून, सज्जाद हसन काद्री, रा. सावर्डे. अडरेकर मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यास ०१ वर्षा करिता चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याचा आदेश पारीत केलेला आहे.www.konkantoday.com