
दारु दुकाने बाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ मेपासून जाहीर करताना केंद्र सरकारने आता काही झाेन मध्ये अटी घालुन दारु विक्रीलाही परवानगी दिली आहे. त्यामुळे दारुची दुकाने सुरु करा अशी मागणी करणाऱ्या मद्य शौकिनांना दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी केंद्राची परवानगी मिळाली म्हणजे दारु दुकाने सुरु होतीलच असे नाही. त्यासाठी राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली असली तरी राज्य सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
www.konkantoday.com