सरफराजला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार

_पाच गुन्हे दाखल असलेल्या सरफराज उर्फ बॉक्सर अहमद शहा (वय ३५ रा. गवळीवाडा याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी,सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागिय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी सायंकाळी हे आदेश काढले असून शहर पोलीस सरफराजला ताब्यात घेण्यासाठी रात्री उशिरा रवाना झाले होते.लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता शनिवारी जाहिर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. अवैध व्यावसायातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. शहर पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सरफराज उर्फ बॉक्सर अहमद शहा याच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याला जिल्ह्यातील हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय दंडाधिकार्यांकडे पाठविला होता. त्यावर सुनावणी घेवून उपविभागिय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी शनिवारी सायंकाळी अंतिम आदेश करताना सरफराजला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button