रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज


रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 12 लाख 97 हजार 824 मतदार असून 7 मे रोजी 1715 मतदार मतदान केंद्रावर मतदान करणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची माहिती दिल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून त्यातील दापोली, गुहागर व चिपळूण विधानसभेचा काही भाग हा रायगड लोकसभा मतदार संघाला जोडलेला आहे तर चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा-राजापूर लोकसभा मतदार संघाचा भाग रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 12 लाख 97 हजार 824 मतदार आहेत. त्यामध्ये 6 लाख 27 हजार 908 पुरुष तर 6 लाख 69 हजार 905 महिला मतदार आहेत. 11 तृतीयपंथिय मतदार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. जिल्ह्यात 12 हजार 956 नवीन मतदार असून 5,679 अपंग मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 21 हजार 553 मतदार हे 85 वर्षावरील असून त्यात 5,609 पुरुष तर 13 हजार 933 महिला मतदार आहेत. जिल्ह्यात 100 ते 109 वर्ष असलेले 529 मतदार असून त्यामध्ये 186 पुरुष तर 346 महिला मतदार आहेत.

जिल्ह्यामध्ये 12 एप्रिलपासून नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 7 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवाराला खर्चाला 95 लाखाची मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button