मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी-दिवा पॅसेंजर धावली २ तास विलंबाने
मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी-दिवा पॅसेंजर धावली २ तास विलंबानेकोकण रेल्वे मार्गावरील शुक्रवारी सकाळी ९.३० ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या अडीच तासांच्या मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी-दिवा पॅसेंजर २ तास विलंबाने धावली. अन्य दोन गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. चिपळूण रेल्वेस्थानकात दुरांतो एक्सप्रेसला झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे रेल्वेगाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक शुक्रवारी पूर्वपदावर आलेले असतानाच मालमत्ता देखभालीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला. १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर २ तास उशिराने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे तर २२१४९ क्रमांकाची एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. www.konkantoday.com