
पीएम-उषा अंतर्गत रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला ५ कोटींचे अनुदान
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) अंतर्गत ५ कोटींचे प्रकल्प अनुदान मंजूर झाले आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पीएम उषा (पूर्वीची राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) योजनेंतर्गत राज्याला ५४० कोटींचा निधी मिळाला आहे. राज्याला मिळालेल्या ५४० कोटी रुपयांच्या निधीतून राज्यातील ४ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी तर ७ विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटी रुपये मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) या नव्या उपक्रमाची सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी विशेष अनुदा दिले जाते. www.konkantoday.com