देवरुख येथे श्री. माऊली बालाजी ग्रुपच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत त्यांच्या हस्ते उदघाटन

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख साडवली येथे श्री.माऊली बालाजी ग्रुपच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन भावी खासदार – सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत त्यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अनेक शेतकऱ्यांना सहभाग नोंदवला. तर स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील बैलगाडा रसिकजानानी गर्दी केली होती. यावेळी किरण सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले बैलांना आणि शेतकऱ्यांना दुखापत होणार नाही याचे भान ठेवून स्पर्धा खेळा. आपल्या सगळ्याच्या उत्साहाला मी सलाम करतो. भविष्यात या स्पर्धेला लागेल ती मदत करणार असल्याचा शब्द किरण सामंत यांनी दिला.तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी सदैव तुमच्या सोबत असून तुमच्या अडचणीत कधी ही हक्काने हाक मारा अशी भावनिक साद किरण सामंत सामंत यांनी या कार्यक्रमा निमित्ताने दिली आहे.७ मे ला होणाऱ्या राजकीय स्पर्धेला सगळ्यांनी भर भरून आशीर्वाद द्या अशी अपेक्षा ही व्यक्त केली. या कार्यक्रमाला संगमेश्वर -चिपळूणचे आमदार शेखर निकम, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रमोद पवार, बारक्याशेठ बने, सुदेश मयेकर, ओंकार मोरे, बंड्या बोरुकर, प्रसन्न सार्दळ, सरपंच संतोष जाधव, सावी खरात, राजेश जाधव, पपू नाखरेकर, उमेश देसाई, रमेश परंदे यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button