ठाकरे-पवारांचीराहुल गांधींच्या मुंबईतील सभेला उपस्थिती
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली आहे.या यात्रेच्या समारोपाला रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील हजेरी लावणार आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेदेखील राहुल गांधींच्या व्यासपीठावर दिसणार आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेचं निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलं असून ते रविवारी होणाऱ्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे.www.konkantoday.com