
घराच्या छपरावरून पडून सावंतवाडीत एकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे वेल्डिंगचे काम करत असताना छपरावरून कोसळल्यामुळे रामचंद्र ऊर्फ बाळा अर्जुन मोर्ये (वय ६५) यांचा मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी (ता. १४) दुपारी सर्वोदयनगर परिसरात घडली. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारांदरम्यान शुक्रवारी (१५) त्यांचा मृत्यू झाला. मोर्ये हे येथील शिरोडा नाका परिसरात राहत होते. त्यांचे सर्वोदयनगर परिसरात दुसरे घर आहे. तेथील घराचे छप्पर खराब झाल्यामुळे ते बदलण्याचे काम करत होते. दरम्यान, पत्रा लावण्यासाठी वेल्डिंग करत असताना ते छपरावरून अचानक कोसळले. यात डोक्याच्या बाजूने पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना येथील रुग्णालयात नेण्यात आले; तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोवा-बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. www.konkantoday.com