खेड येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गांधी यांची सिने कलाकार संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड
आयएनसीसी मानव अधिकार, सिनेकलाकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी खेड येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे नियुक्तीपत्रही त्यांना देण्यात आले.सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या विक्रांत गांधी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या माध्यमातून मानवाधिकार कार्य क्षेत्रात येणार्या सर्व बाबींना न्याय देवून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष विक्रांत गांधी यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. www.konkantoday.com