
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबवली
चोरट्याने लांबवलीकोकण रेल्वेमार्गावरील गाडीने प्रवास करणार्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १३ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तक्रारदार हे १३ मार्चला तिरूनवेल्ली ते जामनगर एक्स्प्रेस गाडीने प्रवास करत होते. गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता चोरट्याने सोन्याची चेन लांबवली अशी तक्रार दाखल करण्यात आली.www.konkantoday.com