
इतर उमेदवाराचे नाव, नेमुन दिलेल्या चिन्हाची नमुना पत्रिका छापण्यास निर्बंध
रत्नागिरी दि. 17 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 16 मार्च रोजी कार्यक्रम घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात आल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन दिले आहेत.*१. इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे.२. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे.३. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.000