आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने चिपळूणसह देवरूख शहर विकासासाठी पंधरा कोटी
आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने चिपळूणसह देवरूख शहर विकासासाठी ठोक तरतुदीअंतर्गत तब्बल पंधरा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२३-२४ करिता चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील ३५ वस्त्यांमध्ये ३ कोटी ९६ लाखाच्या कामांना प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून घेण्यात आमदार निकम यशस्वी झाले आहेत.
गेल्या साडेचार वर्षात आमदार निकम यांनी चिपळूण शहरासह देवरूखसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विविध योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे दोन्ही शहरांच्या विकासाला हातभार लागला आहे. कधी नव्हे तो बर्याच वर्षानंतर या शहरांसाठी मोठा निधी प्राप्त झालेला आहे.
www.konkantoday.com