
अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
_मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली.अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली.मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आंदोलन सुरू असतानाही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. आपण मराठा आरक्षण प्रक्रियेत यापूर्वीही काम केले आहे. समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये काय घडले हे मला माहिती नाही. सगेसोयरे अध्यादेशावर हरकती आल्या आहेत. आज आचासंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्यावरील प्रक्रिया किती पूर्ण होईल हे आताच सांगता येत नाही. समाजाचा प्रश्न समन्वयातून सुटावा यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.www.konkantoday.com