संगमेश्वर तालुक्यातील परचुरी बावनदीच्या खाडीत बुडून 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू
उशिराने या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण महादेव कळंबटे (रा. परचुरी कळंबटेवाडी) असे मृत तरूणाचे नाव आहे. कळंबटे या हा बुधवारी परचुरी येथील बावनदीमध्ये शौचालयासाठी गेला होता.किनयीचे शेत आंब्याच्या झाडाखाली तो शर्ट व चप्पल काढून गेला होता. पाय घसरल्याने तो खाडीत पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवीण याचा मृत्यू झाला. याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. या घटनेची नोंद रात्री उशिराने संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. www.konkantoday.com