लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार, नेत्यांच्या गाड्या होणार जमा
निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १६) आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी आवश्यक कामे उरकून टाकण्यासाठी प्रशासनाची लगबग दिसून आली.दुसरीकडे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हा निवडणूक विभागाची जवळपास तयारी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा लोकसभेसाठी आचारसंहिता उशिराने लागत आहे. त्यामुळे इतर कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदानाचे टप्पे कमी होतील किंवा मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या दोन टप्प्यांमधील दिवसांचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची घाई दिसून आली. काही विभागाकडून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. काहींकडून निविदा प्रक्रिया अंतिम करून कार्यादेशही देण्यात आले. इकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही निवडणुकीसाठी तयारी जवळपास पूर्ण करण्यात आली.शनिवारी दुपारी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे मंत्री, पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात येतील. त्याचप्रमाणे सर्व नेत्यांचे पोस्टर, बॅनर व होर्डिंगही काढण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे समजते. अनेक एसटी बस शासकीय योजनांच्या प्रसिद्धीचे पत्रक लावण्यात आले आहे. तेसुद्धा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.www.konkantoday.com