
चिपळूणमध्ये ड्रगविरोधी महारॅली
चिपळूण शहर आणि परिसरामध्ये गेल्या काह महिन्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाल्यापासून नागरिकांनी स्वतःहून पुढे येवून चिपळूण सिटीझन मुव्हमेंटची स्थापना केली व त्या माध्यमातून जनजागृतीस प्रारंभ केला. चिपळूण सिटीझन मुव्हमेंट आणि चिपळूण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या महारॅलीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
चिपळूण सिटीझन मुव्हमेंटतर्फे गेले दोन महिने अंमली पदार्थ विरोध मोहीम राबविण्यात आली व त्याचाच भाग म्हणून जवळपास १७ शाळांमधून ७००० विद्यार्थ्यांना जनजागृती कार्यक्रमांतर्गत माहिती देण्यात आली व या मोहिमेचा महत्वाचा टप्पा म्हणजे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. www.konkantoday.com