राजापुरात रिफायनरी समर्थक समन्वय समितीची स्थापना राजापूर
तालुक्यात होवू घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प समर्थकांची बैठक नुकतीच पार पडली असून यावेळी नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीची निवड करण्यात आली. यामध्ये नाणार परिसराकरिता प्रल्हाद तावडे (विलये), बारसू परिसर पुरूषोत्तम खांबल (धोपेश्वर), तर राजापूर शहराकरिता संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.या बैठकीला नाणार, बारसू व शहरातील प्रकल्प समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाकरिता पुढची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून सुहास मराठे, मनोज परांजपे, विनायक कदम तर समन्वयक म्हणून विद्याधर राणे, सिद्धेश मराठे यांची निवड करण्यात आली आहे. www.konkantoday.com