रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली मागणी…
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. रत्नागिरी शहरातील भैरी मंदिर आणि तेथे होणारा होळी उत्सव हा रत्नागिरी वासियांसाठी अभिमानाचा आणि श्रद्धेचा विषय असून. भैरी मंदिर ते खालची आळी, टिळक आळी- काँग्रेस भुवन, आठवडा बाजार, गोखले नाका, मुरलीधर मंदिर आदी परिसरामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून ठीक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. होळी उत्सवानिमित्त या परिसरामध्ये वर्दळ पाहायला मिळते तरी या परिसरातील सर्व रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी निवेदनातून रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे १५ मार्च रोजी करण्यात आली आहे.