रत्नागिरीत तारली-बांगडा विषयक रत्नागिरीत कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी येथे ओमेगा फिशमील कंपनी रत्नागिरी आणि टी. जे. मरीन प्रॉडक्टस यांच्यातर्फे महाराष्ट्र आणि गावा किनारपट्टीवरील तारली आणि बांगडा मत्स्य-सुधार प्रकल्पांतर्गत पाचवी एकदिवसीय कार्यशाळा हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येेथे पार पडली.या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरणीय जबाबदारी आणि संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये मत्स्य उत्पादनांची पारदर्शकता यासह मत्स्य व्यवस्थापन आणि प्रशासनाची कार्यक्षमता सुधारणे आहे. ओमेगा फिशमीलचे संचालक अमोल पाटील यांनी स्वागत केले आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले २०१७ मध्ये सुरू झालेल्या या मत्स्य सुधारणा प्रकल्पाने गेल्या ६ वर्षात विशेष २०२०-२२ या कालावधीत कोविडच्या महासंकटाला समोर जात लक्षणीय प्रगती केली आहे. कार्यशाळा आयोजित करण्यात मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीने महत्वाची भूमिका बजावली. www.konkantoday.com