प्रस्तावित साखरीनाटे जेटीला विरोध असतानाही जनसुनावणी उरकली
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गयाळकोकरी येथील प्रस्थावित साखरीनाटे जेटी प्रकल्पाच्या पर्यारवण घातक मुल्यांकन अहवाल मराठीत उपलब्ध होत नाही तोपर्यंत जनसुनावणी घेवू नये, अशी मागणी धाऊलवल्ली ग्रामपंचायतीने केलेली असताना गुरूवारी घाई-गडबडीत जनसुनावणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यामुळे धाऊलवल्ली परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये गयाळकोकरी या ठिकाणी साखरी नाटे जेटी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे दीडशे कोटी रुपयांचा हा महाकाय जेटी प्रकल्प प्रस्तावित असताना धाऊलवल्ली ग्रामस्थांना अंधारात ठेवून हा प्रकल्प राबविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. www.konkantoday.com