नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पडोस युवा संसद
रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप येथे पडोस युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.*कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी इंद्रजीत चाळके, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक संतोष पिलणकर, वसुधा पांचाल, अन्वी दाभोलकर आणि अन्य गटनिदेशक उपस्थित होते.यावेळी आस्था सोशल फाउंडेशन च्या सचिव सुरेखा पाथरे यांनी नारीशक्ती विषयावर मार्गदर्शन केले तर सहायक शिक्षक हरीश अशोक सामंत यांनी वोकल फोर लोकल या विषयावर देशातील प्रत्येक नागरिकांने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं खरेदी करावं तसेच नवनवीन व्यवसायाची माहिती देऊन युवांना या संदर्भात मार्गदर्शन केले यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थानाचे विद्यार्थी मार्फत मॉक पार्लमेंटचे देखील आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत संसदीय कामकाज कशा प्रकारे चालते याचा अनुभव युवकांनी घेतला. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण राठोड यांनी केले.000