द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड १७ रोजी चिपळुणात

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने ८ मार्चपासून सुरू झालेली दहा दिवसांची चिपळूण प्रिमियर लिग राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील पवन तलाव मैदानावर सुरू झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्च रोजी होणार असून सायंकाळी साडेचार वाजता होणार्‍या बक्षीस समारंभाला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे तालुकाध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.दिनेश लाड हे रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक आहेत. रेल्वेत ते सेवेत होते. त्यांचा मुलगा सिद्धार्थ लाड हाही रणजीपटू आहे. सध्या तो गोव्याकडून खेळतो. त्याचबरोबर प्रदीप कासलीवाल हे मुंबई रणजी खेळाडू आहेत. मुंबई सॅटलाईट ऍकॅडमीचे ते मुख्य प्रशिक्षक आहेत. भारतीय संघात खेळण्याची त्यांची संधी हुकली, तरीही क्रिकेटच्या सर्व प्लॅटफॉर्ममध्ये ते खेळले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button