दहाव्या डेरवण युथ गेम्सचे २१ व २८ मार्च दरम्यान आयोजन

श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणार्‍या दहाव्या डेरवण युथ गेम्सचे २१ व २८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. भारतीय आणि ऑलिंपिक खेळांचा संगम असणार्‍या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.या स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्स, जिमनॅस्टिक, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धीबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिंपिकमध्ये समाविष्ट वॉल क्लाईम्बिंग या साहससी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. १०५० पदके, १११ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीसरूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्‍चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button