
खेड रेल्वेस्थानकातून सुरू होणार्या कंटेनर वाहतुकीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात,
खेड रेल्वेस्थानकातून कंटेनर वाहतुकीचा शुभारंभ कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वेस्थानकातून सुरू होणार्या कंटेनर वाहतुकीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. गुरूवारपासून येथील रेल्वेस्थाकातून कंटेनर वाहतुकीची सेवा सुरू झाली आहे. कंटेनर वाहतुकीच्या दृष्टीने टाकण्यात आलेल्या सकारात्मक पावलांमुळे सुरू झालेल्या वाहतुकीमुळे कोकणातील उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. या सेवेमुळे कोकण मार्गावर व्यापार वृद्धीलाही खर्या अर्थाने चालना मिळणार आहे.खेड रेल्वेस्थानकातून कंटेनर वाहतूक सुरू करावी, असा आग्रह लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसह खेर्डी व गाणेखडपोली येथील उद्योजकांनी रेल्वे प्रशासनाकडे धरला होता. रेल्वे वरिष्ठ अधिकार्यांनी ही बाब गांभीर्याने घेत येथील स्थानकात यार्डाची उभारणी करण्याचे काम हाती घेतले. यासाठी एक ट्रॅकही वाढवण्यात आला आहे. याशिवाय लोटे व अन्य ठिकाणांवरील अवजड वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी ७ ते १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रशासनासह कॉनकॉर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. यार्डात गोदाम, शीतगृह यासह विविध योजनांतर्गत पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर दिला होता. सद्यस्थितीत ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ५ टक्के काम प्रलंबित आहे. हे कामही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. येथील स्थानकांतून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, अधिकारी तसेच चिपळूण येथील उद्योजक यांच्याशी चर्चा करत त्यांच्या शंकांचेही निरसन करण्यार भर दिला होता. www.konkantoday.com