
कोकण रेल्वे मार्गावर तांत्रिक कारणामुळे वाहतूक विस्कळीत
दुरंतो एक्स्प्रेस चिपळूण रेल्वेस्थानकात आल्यानंतर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी दुपारनंतर कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. चिपळूण रेल्वेस्थानकातील तिनही ट्रॅकवर मालगाडीसह दुरंतो, हापा या गाड्यांसह मुंबईच्या दिशेने चाललेली निजामुद्दीन एक्स्प्रेसही स्थानकाजवळ थांबवून ठेवण्यात आली. बिघाड काढल्यानंतरच तब्बल २ तासांनी वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावर धावत असलेल्या १२ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.चिपळूण रेल्वेस्थानकात गुरूवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दुरंतो एक्स्प्रेस दाखल झाली. मात्र त्यावेळी तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर ती तेथेच थांबवण्यात आली. त्याचवेळी आलेली हापा-मडगांव एक्स्प्रेसही चिपळूण रेल्वेस्थानकातील तिसर्या ट्रॅकवर थांबून ठेवण्ययात आली होती. मधल्या ट्रॅकवर मालगाडी थांबवण्यात आल्यामुळे निजामुद्दीन एक्स्प्रेसही रत्नागिरीच्या दिशेने येवून चिपळूण रेल्वेस्थानकासमोर थांबली. तर नेत्रावती एक्स्प्रेस अंजनी रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आली. www.konkantoday.com