
संगमेश्वर तालुक्यात मौजे देवरुख येथील आंबाघाट जवळ व गुहागर-चिपळूण-कराड रस्त्यावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 61.62 मिमी. पाऊस तर एकूण 554.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 51.50 मिमी, दापोली 26.70 मिमी, खेड 63.60 मिमी, गुहागर 54.30 मिमी, चिपळूण 66.10 मिमी, संगमेश्वर 80.30 मिमी, रत्नागिरी 75.70 मिमी, राजापूर 69.00 मिमी, लांजा 67.40 मिमी पावसाची नोंद झाली
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 21 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
गुहागर तालुक्यात मौजे गुहागर-चिपळूण-कराड रस्त्यावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे देवरुख येथील आंबाघाट जवळ दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे.
www.konkantoday.com