स्लीपर वंदे भारतची दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?
वंदे भारत चेअर कारनंतर आता प्रवाशांना स्लीपर वंदे भारतची प्रतीक्षा आहे. मात्र त्यासाठी त्यांना आणखी किमान दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन करण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तयार करावी लागणार आहेत्यासाठी आणखी किमान वर्ष लागण्याची शक्यता आहे. लातूर येथील मराठवाडा कोच कारखान्यात वंदे भारतचे स्लीपर ट्रेन तयार होणार आहे.www.konkantoday.com